जेट एअरवेजची सेवा आज रात्रीपासून बंद

नवी दिल्ली – जेट एअरवेजच्या सर्व सेवा आज रात्री 12 पासून बंद होणार आहे. आज रात्री 10.30 वाजता मुंबईहून अमृतसरला अखेरचे विमान उड्डाण घेणार आहे.

अनेक अडचणीचा सामना करणारी जेट एअरवेज कंपनी मर्यादित काळासाठी बंद ठेवली जाण्याची शक्‍यता गुंतवणूकदाराच्या वर्तुळात व्यक्त केली जात होती, अखेर ही शक्यता खरी ठरली आहे. बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने एकेकाळी भारताची सगळ्यात मोठी एअरलाइन असलेली जेट एअरवेजची सेवा आज रात्रीपासून बंद होणार आहे. जेट एअरवेज कंपनी बंद पडल्याने जवळपास 200 लोक बेरोजगार होणार आहेत.

जेट एअरवेज कंपनीला घरघर, कंपनी मर्यादित काळासाठी बंद होण्याची शक्‍यता वाढली

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.