जेट एअरवेजमुळे नागरी विमान वाहतुकीवर परिणाम

मुंबई – जेट एअरवेजची सेवा बंद झाल्यामुळे एप्रिल महिन्यात विमान प्रवासाच्या संख्येत 4.2 टक्‍क्‍यांची घट होऊन प्रवाशांची संख्या 10.99 दशलक्षवर आली आहे.

जुलै 2013 पासून मार्च 2019 पर्यंत विमान प्रवाशांची संख्या उत्तरोत्तर वाढत होती. त्याचबरोबर प्रवास भाडे मर्यादित होते. मात्र जेट एअरवेजच्या सेवा फेब्रुवारी महिन्यापासून कमी होण्यास सुरुवात झाली त्यानंतर प्रवाशी संख्येत घट झाली. त्याचबरोबर भाड्यातही वाढ होत आहे.

मागणी जास्त आणि पुरवठा कमी या कारणामुळे ही परिस्थिती उद्‌भवली आहे. भारतातील एकूण नागरी विमान वाहतूकीत जेट एअरवेजचे योगदान 14 टक्के होते. ते पूर्ण थांबली असल्यामुळे इतर कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम होऊ लागला असल्याचे दिसून येते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×