जेट एअरवेजचे कर्मचारी करू लागले स्थलांतर

100 वैमानिक आणि 400 कर्मचारी स्पाईसजेटमध्ये रूजू

नवी दिल्ली, दि. 22-बंद पडलेली जेट एअरवेज कंपनीचे कर्मचारी स्पाईसजेटमध्ये रुजु झाले आहे. स्पाईसजेटने ही माहिती दिली आहे. आतापर्यंत 100 वैमानिक आणि 400 कर्मचारी स्पाईसजेटमध्ये रूजू झाले असून अधिक कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असेही स्पाईसजेटने म्हटले आहे.

गेल्या काही वर्षांपासून जेट एअरवेज ही कंपनी डबघाईला आली होती. कर्मचाऱ्यांनी सरकारकडेही गळ घातली. अखेर बॅंकांनीही हात वर केल्याने कंपनी मर्यादित काळासाठी बंद पडली आणि अनेक कर्मचाऱ्याचे काम गेले आहे. त्यानंतर स्पाईसजेटने मदतीचा हात पुढे करत 100 वैमानिकांना नोकरी दिली. तसेच 200 केबिन कर्मचारी व 200 तांत्रिक आणि विमानतळ कर्मचारीही स्पाईसजेटमध्ये रुजू झाले आहेत. स्पाईसजेटमध्ये अजून कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असे स्पाईसजेटने म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)