जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

मुंबई – मुंबईतील नालासोपाऱ्यात जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्याने आज इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शैलेंद्र सिंह (४३) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, मागील तीन वर्षांपासून ते कर्करोगाने त्रस्त असल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कठीण आर्थिक परिस्थिमुळे तणावाचा सामना करत असल्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचा दावा जेटच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. जेट एअरवेजची सेवा बंद झाल्यामुळे हा कर्मचारी आणि त्यांचा मुलगा दोघेही बेरोजगार झाल्यानेच तणावात आत्महत्या केल्याचे इतर कर्मचाऱ्यांनी म्हंटले आहे.

बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने एकेकाळी भारताची सगळ्यात मोठी एअरलाइन असलेली जेट एअरवेजची सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.