याशिनाकडून जेनिफरचा पराभव

पुणे: एनइसीसी डेक्कन आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत पात्रता फेरीत जेनिफर लुईखाम या एकमेव भारतीय खेळाडूचे आव्हान संपुष्टात आले.

रशियाच्या याशिना एकतेरिना हिने जेनिफर लुईखामचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. ग्रेट ब्रिटनच्या इमा राडकानू हिने चीनच्या जिया-की कॅंगचा 6-4, 6-1 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. थायलंडच्या पुनिन कोवा पिटुक्‍टेडने कडवी झुंज देत थायलंडच्या मनंचया सवायिंखचा 6-1, (4) 6-7, 12-10 असा पराभव केला.

रशियाच्या ओल्गा दोरोशिनाने इस्रायलच्या वालदा कॅटीचचा 5-7, 6-2, 11-9 असा तीन सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. इटलीच्या कोरिना डेंटोनीने पिछाडीवरून जोरदार खेळ करत ग्रेट ब्रिटनच्या फ्रेया ख्रिस्तीचा 4-6, 6-2, 10-8 असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.

ऑस्ट्रेलियाच्या अलिसिया स्मिथने जपानच्या नी मा झुओमाचा 6-4, 6-2 असा तर, जपानच्या सातो नाहोने स्टेफी कॅररुथर्सचा 1-6, 6-3, 10-4 असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले.

Leave A Reply

Your email address will not be published.