बॉ लीवूडमधीत पॉप स्टार आणि ऍक्ट्रेस जेनिफर लोपेझ काही दिवसांपूर्वीपासून ऍक्टर बेन ऍफ्लेक्सबरोबरच्या अफेअरमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. जवळपास दोन दशकांनंतर हे दोघे पुन्हा एकत्र आले आहेत. 2002 मध्ये “गिगील’च्या सेटवर एकत्र आले होते. त्यानंतर ते वेगळेही झाले होते. याशिवाय आणखीन एका कारणामुळे ती विशेष चर्चेत आली आहे. नेटफ्लिक्सवरच्या एका फिल्ममध्ये ती असणार आहे.
“ऍटलास’ असे या नवीन फिल्मचे नाव आहे. ही फिल्म सायन्स फिक्शन अधिक असणार आहे. या फिल्मचे प्रॉडक्शनदेखील नेटफ्लिक्सच करणार आहे. याची थीम थोडीशी “टर्मिनेटर’सारखी असणार आहे. भविष्यातील मानवतेला वाचवण्यासाठी आजच्या आर्टिफिशियल इंटिलीजन्सला पराभूत करणे आवश्यक असते. हे काम एका महिलेने स्वीकारलेले असते.
त्या महिलेचे काम जेनिफर लोपेझ करणार आहे. यंत्रयुगाचा आणि मानवाचा संघर्ष या फिल्ममध्ये दिसणार आहे. आर्टिफिशियल इंटिलीजन्सचा पराभव करण्यासाठी जेनिफर लोपेझलाही आर्टिफिशियल इंटिलीजन्सचाच आधार घ्यावा लागतो आहे. हा थरार नेटफ्लिक्सवर लवकरच दिसणार आहे.