लंडन – भारताच्या तीन महिला क्रिकेटपटूंनी इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या द हंड्रेड क्रिकेट लीगमध्ये अफलातून कामगिरी केली आहे. जेमिमा रॉड्रीग्ज, शेफाली वर्मा व दीप्ती शर्मा यांनी आपल्या कामगिरीने आपापल्या संघांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.
दीप्तीने लंडन स्पिरीट संघाकडून खेळताना मॅंचेस्टर ऑरिजिनल्सविरुद्ध विजयी खेळी केली.मॅंचेस्टर ऑरिजनल्सने प्रथम फलंदाजी करत 100 चेंडूंत 5 बाद 127 धावा केल्या.
दीप्तीने 20 चेंडूत केवळ 10 धावा देत 2 बळी घेतले. लंडन स्पिरीट संघाने 5 बाद 128 धावा करत विजयाची नोंद केली. दीप्तीने केवळ 20 चेंडूत नाबाद 34 धावा केल्या.