जेजुरीच्या खंडोबाचे सात दिवस देऊळबंद

जेजुरी -पुणे जिल्हा, शहर व ग्रामीण भागातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी (दि. 2) एप्रिल पासून प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. त्या अनुषंगाने जेजुरीच्या खंडेरायाचे मंदिर भाविकांना दि. 9 एप्रिल पर्यंत बंद करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांनी जेजुरीत देवदर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन देवसंस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

खंडोबा गडाचे दरवाजे बंद केले असले तरी श्रींचे नित्याचे धार्मिक विधी आठवडेकरी पुजारी, मोजके सेवेकरी व वारकरी यांच्या हस्ते होणार आहेत. पुरंदरमध्ये करोनाचे रुग्ण वाढत असून किमान 100 रुग्णांची क्षमता असलेल्या मार्तंड देवसंस्थानच्या जेजुरी येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या शंभरीपार आहे. नागरिकांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन देवसंस्थानच्या वतीने केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.