जेजुरी- तीर्थक्षेत्र जेजुरीत ऐतिहासिक मर्दानी दसरा उत्सवात सुमारे 43 किलोचा खंडा जास्तीत जास्त वेळ पेलून धरणे, त्याच्या कसरती करणे या स्पर्धेत सुमारे 50 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यातील जास्तीत जास्त वेळ खंडा तोलून धरण्याच्या स्पर्धेत रमेश शेरे यांनी (17 मी. 34 सेकंद) येवढा वेळ खंडा तोलून प्रथम क्रमांक मिळविला. मंगेश चव्हाण यांनी (13 मी. 41 से.), हेमंत माने यांनी (13 मी. 14 से.) अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. विजय कामथे आणि नितीन खोमणे यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.
कसरतीच्या स्पर्धेत सचिन कुदळे यांनी प्रथम तर शिवाजी राणे यांनी दुसरा क्रमांक पटकाविला. नितीन कुदळे यांनी तिसरा क्रमांक मिळवला तर विशाल माने आणि अक्षय गोडसे यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. विजेत्यांना अनुक्रमे 21000, 15000, 11000, तर उत्तेजनार्थ 5000 रुपये व स्मृतीचिन्ह देण्यात आले. यावेळी देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. अशोक संकपाळ, विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे, राजकुमार लोढा, तुषार सहाणे, प्रसाद शिंदे, माजी विश्वस्त डॉ. प्रसाद खंडांगळे, सुधीर गोडसे, संदीप घोणे, नितीन राऊत, समस्त ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने उपस्थित होते.