जेजुरी- हैद्राबाद प्रकरणाचा जेजुरी (ता. पुरंदर) येथे तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेने देशातील मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी यातील चार आरोपींना अटक केली असली तरी त्यांना शिक्षा कधी होणार हा प्रश्न आहे. जेजुरी येथे जय मल्हार कला ऍकॅडमी आणि जिजामात हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्यातून या घटनेच्या भावना व्यक्त केल्या.
या वेळी जिजामातचे प्राचार्य नंदकुमार सागर आणि शिक्षक शिक्षिका यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जय मल्हार कला ऍकॅडमीच्या मुलींनी आपल्या नृत्याविष्कारातून स्व-संरक्षणाबाबत जनजागृती करत स्वतःची काळजी घेण्याबाबत संदेश दिला. संपूर्ण देशातून या नराधमना फाशीच झाली पाहिजे, अशी मागणी करून याबाबत नुसत्या चर्चा नकोत तर आरोपींना त्वरीत फाशी द्या, असा आक्रोश होत आहे.