जेफ बेझोस जगातील सर्वाधीक श्रीमंत व्यक्ती

न्यूयॉर्क – ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्‍सच्या जगातल्या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचे प्रथम स्थान अबाधित आहे. तर, बिल गेट्‌स यांची घसरण झाली असून त्यांना तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले आहे. एलव्हीएमएच या लक्‍झरी गुड्‌स कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ यांनी दुसऱ्या स्थानी झेप घेत बिल गेट्‌स यांना धक्का दिला आहे. गेल्या सात वर्षात हे प्रथमच घडत आहे.

जेफ बेझोस यांची संपत्ती 125 अब्ज डॉलर्स आहे. बेझोस यांचा नुकताच घटस्फोट झाला असून त्यांनी पत्नी मेकेन्झी बेझोस यांना काही रक्कम दिली होती. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात घट झाल्याचे समोर येत आहे. मेकेन्झी या जगातील सर्वाधिक श्रीमंत महिला ठरल्या आहेत. तर, बिल गेट्‌स यांनी बिल अँड मेलिंडा गेट्‌स फाउंडेशनला 35 अब्ज डॉलर्स दान केल्याने त्यांचीही संपत्ती घटली.

बर्नार्ड अर्नाल्ट यांचे उत्पन्न मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्‌स यांच्या संपत्तीहून 200 दशलक्ष डॉर्लर्सने जास्त असून त्यांचे वार्षिक उत्पन्न 107.6 अब्ज डॉलर्स आहे. 2019 या एका वर्षांत अर्नाल्ट यांनी आपल्या संपत्तीत 39 अब्ज डॉलर्सची भर घातली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)