तोरणमाळ घाटात जीप दरीत कोसळली; सहा ठार

मृतांची संख्या वाढण्याची शक्‍यता

तोरणमाळ – धडगाव तालुक्‍यातील सातपुड्यातील दुर्गम भागातील तोरणमाळ घाटातील खडकी रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणारी जीप 70 फुट खोल दरीत कोसळली आहे.यात सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतकांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जीपमध्ये 31 प्रवासी होते अशी माहिती आहे.

प्रत्यक्षादर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार मजुर घेऊन जाणारी जीप दरीत कोसळल्याने आणि जीप झाडा-दगडांवर जोरदार आदळल्याने मृत्यू झाला. यात लहान मुलीचा देखील समावेश आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरू आहे. जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रवासी जीप खोल दरीत कोसळल्याने प्रवाश्‍यांचा शोध सुरू आहे.

अपघात इतका भीषण झाला आहे की प्रवाशी जीपचे सर्व भाग दरीत अस्ताव्यस्त पडलेले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. म्हसावद पोलीस घटनास्थळी दाखल झाले.आजूबाजूचे ग्रामस्थ घटनास्थळी मदत करीत आहे. दरीतून मजुरांचे प्रेत काढण्यासाठी अवघड जात आहे. जखमींना मिळेल त्या साधनाने रूग्णालयात नेण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.