जीप-दुचाकीच्या अपघातात एक ठार, एक अत्यवस्थ

टाकळीभान: श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गावरील टाकळीभान भोकर सीमेवरील चारी नंबर 15 जवळील बनकर रसवंती गृहाजवळ महेंद्रा बोलेरो जीप व दुचाकीच्या झालेल्या आपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर त्याच्यासोबत असलेली 8 वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली.

श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावरुन सकाळी 12 वाजेच्या दरम्यान एम.एच. 17 – डब्लु – 6368 या दुचाकीवरुन अव्वलगाव (वैजापूर) येथील अनिल जोसेफ सिनगारे (वय 48) हे आपली आठ वर्षाची मुलगी दीदी हीला घेऊन श्रीरामपूर तालुक्‍यातील अशोकनगर येथे सासुरवाडीला जात होते. टाकळीभान भोकर सिमेलगत असलेल्या चारी नं. 15 जवळील बनकर रसवंती गृहाजवळून जात असताना समोरुन आलेल्या महेंद्रा बोलेरो जीप क्र. एम.एच.14 – सी.आर. 133 ची दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वाराला डोक्‍याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला तर, दुचाकीस्वारासोबत असलेली 8 वर्षाची मुलगी जबर जखमी झाल्याने, तीला तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचार करुन तिला नगरच्या जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपघात एवढा जोराने झाला की, आपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला. अपघातात मयत झालेल्या व्यक्तीच्या खिशात मोबाईल किंवा ओळख पटविण्यासाठी कागदपत्र आढळून न आल्याने मयत दुचाकिस्वाराची ओळख पटविण्यात अडचणी आल्या.

टाकळीभान दुरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी आर.एस. पवार, पोलीस सहाय्यक बाबा शेख यांना अपघाताची माहिती समजताच मदतीसाठी घटनास्थळाकडे धाव घेऊन अत्यवस्थ असलेल्या मुलीला उपचारार्थ श्रीरामपूर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णवाहीका बराच वेळ उपलब्ध न होऊ शकल्याने मृतदेह बराच वेळ घटनास्थळी पडून होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)