JEE Main 2021 : पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा; नंतर देता येणार परीक्षा

पुणे – आयआयटी, एनआयटी आणि नामवंत अभियांत्रिकी संस्थामधील प्रवेशासाठी अनिवार्य असलेली जेईई मेन परीक्षा देशभरात 25, 27 जुलै रोजी होत आहे. मात्र अतिवृष्टीमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा देता येऊ न शकणाऱ्याना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड सिंधुदुर्ग सांगली आणि सातारा या पूरग्रस्त भागात परीक्षा केंद्रावर पोहचू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई मेन 2021 तिसऱ्या टप्प्यातील परिक्षेसाठी संधी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी चिंता करू नये, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटद्वारे दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.