जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षा 3 जुलैला

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची घोषणा

 

पुणे – देशातील आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आयटी, नामवंत अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षा दि. 3 जुलै 2021 रोजी होणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी गुरुवारी केली.

आयआयटी खरगपूर यांच्यामार्फत ही परीक्षा होणार आहे. यंदा करोनाच्या स्थितीमुळे विलंबाने सुरू झालेले शैक्षणिक वर्ष, विलंबाने झालेल्या परीक्षा, विद्यार्थ्यांवरील ताण या सर्व बाबी लक्षात घेऊन बारावी परीक्षेत 75 टक्‍के गुणांच्या अनिवार्यतेची अट यंदा रद्द केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

जेईई मेन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी टॉपर अडीच लाख विद्यार्थी हे जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र असतात. आता या परीक्षेची तारीख जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेचे नियोजन करणे शक्‍य होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.