फ्रान्सच्या पंतप्रधानपदी जीन कॅस्टेक्‍स; एडवर्ड फिलीप यांच्या राजीनाम्यानंतर तातडीने निवड

 

पॅरिस- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्युनेल मॅक्रॉन यांनी शुक्रवारी पंतप्रधानपदी जीन कॅस्टेक्‍स यांची निवड केली आहे. कोविड-19च्या साथीपाठोपाठ आर्थिक गर्तेत सापडलेल्या फ्रान्सला सावरू न शकल्याने पंतप्रधान एडवर्ड फिलीप यांनी राजीनामा दिला होता. गेली 3 वर्षं ते पंतप्रधानपदी होते. राष्ट्राध्यक्ष इम्युनेल मॅक्रॉन यांनी फिलीप यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर ही निवड करण्यात आली आहे.

कॅस्टॅक्‍स म्हणाले, फ्रान्सचे जनजीवन पुन्हा हळूहळू सुरू करण्यात येण्यासाठी प्राथमिकता देण्यात येणार आहे. तसेच आर्थिक संकटाला समोरे जाताना विविध उपाययोजना अमंलात आणल्या जातील. यासाठी नवीन योजना आखण्यात येतील. आपल्या कार्यकाळातील उर्वरित दोन वर्षांसाठी देशाच्या पुनर्बांधणीसाठी ध्येयधोरणे राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. तसेच गेल्या तीन वर्षांत फिलिपच्या उल्लेखनीय कार्याचे देखील त्यांनी कौतुक केले.

करोना व्हायरसने फ्रान्समध्ये हाहाकार माजवला होता. या साथीत 29875 लोकांचा बळी फ्रान्समध्ये गेला. जगभरातला सर्वाधिक मृत्यूदर हा फ्रान्समधला ठरला आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या प्रत्येक 100 पैकी 17 हून अधिक नागरिकांचा या आजारात जीव गेला आहे. यामुळे फ्रान्समध्ये मोठी दहशत पसरली आणि आधीच आर्थिक गर्तेत अडकलेला देश ठप्प झाला.

अजूनही फ्रान्सला आर्थिक संकटातून बाहेर येण्याचा मार्ग सापडलेला नाही. या कारणाने एडवर्ड फिलीप यांनी राजीनामा दिला. तो राष्ट्राध्यक्षपदी असणाऱ्या त्यांच्या पक्षाच्या इम्युनेल मॅक्रॉन यांनी तातडीने सवीकारला. मॅक्रॉन यांना स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा सुधारण्याची आवश्‍यकता असल्यामुळे त्यांनी तातडीने फिलीप यांचा राजीनामा मंजूर केल्याची चर्चा आहे. दरम्यान, सरकारी सदस्यांमध्येही मोठे फेरबदल होण्याची अपेक्षा आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.