‘त्या’ गाळ्यांवर फिरला जेसीबी

जिल्हाधिकारी तथा आयुक्तांनी दिले आदेश
वाडिया पार्क क्रीडा संकुलात धडक कारवाई
मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाची कारवाई
पोलिसांचा कडक बंदोबस्त
नगर (प्रतिनिधी) – तत्कालीन नगरपालिकेने 1998 साली वाडिया पार्कची जागा क्रीडा संकुलासाठी जिल्हा क्रीडा संकुल समितीकडे हस्तांतरीत केली होती. या समितीने ती जागा विकसीत करण्यासाठी एका ठेकेदाराला दिली. मात्र, त्या ठेकेदाराने मंजुरी पेक्षा जास्त बांधकाम केले. याबाबत महानगरपालिकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याबाबत 2013 रोजी न्यायालयाने हे अनधिकृत गाळे पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात या गाळ्यांवर बुलडोझर फिरविला.

महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशावरून रविवारी (दि.8) रोजी सकाळी सात वाजता करण्यात आली. तत्कालीन नगरपालिकेने 1998 साली वाडिया पार्कची जागा क्रीडा संकुलनासाठी हस्तांतरीत केली होती. या समितीने ती जागा विकसीत करण्यासाठी शहरातील एम. आर. मुथ्था या ठेकेदाराला दिली होती. मात्र, त्याठेकेदाराने मंजुरी पेक्षा जास्त बांधकाम केल्याने महानगरपालिकेने याबाबत याचीका दाखल केली होती. त्यामुळे वाडिया पार्क क्रीडा संकुल उभारण्यात आलेली अनधिकृत इमारत अनेक वर्षांपासून वादात भोवऱ्यात सापडली. या इमारतीचा वाद न्यायालयात गेला. त्यामुळे ही इमारत पाडण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला मुहूर्त सापडत नव्हता.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग हे सेवानिवृत्त झाल्याने महापालिकेचा प्रभारी पदभार हा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे येताच त्यांनी वाडिया पार्क मधील अनाधिकृत गाळ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार शनिवारी रात्री उशिरा अतिक्रमणविरोधी पथक प्रमुख सुरेश इथापे यांनी कारवाईचे नियोजन करून, पोलीस बंदोबस्तात कारवाई केली. यावेळी दोन पोलीस अधीकारी, 25 कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी अतिक्रमन विभाग प्रमुख सुरेश इथापे यांच्यासह रिजवान शेखे, अर्जुन जाधव यांसह 30 ते 40 कर्मचारी, दोन जेसीबी, एक ट्रक अशांचा समावेश होता. आज सकाळीच पोलीस बंदोबस्तात अनधिकृत इमारत पाडण्यास सुरुवात झाल्याने शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

शहरातील इतर अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई कधी?
महापालिका हद्दीत ही मोठ्या प्रमाणात अनधिकृत पक्के अतिक्रमण आहेत. त्यावरही मनपाच्या अतिक्रमण विभागाने हतोडा टाकावा व कारवाईत भेदभाव न करता बड्या अतिक्रमण धारकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.