JBM Auto Ltd Share Price | भारतीय शेअर बाजाराचा आलेख पुन्हा वरच्या दिशेने चढताना दिसत आहे. बाजारात मागील आठवड्याभरात मोठी तेजी दिसून आली. मागील काही महिन्यात बाजारात घसरण पाहायला मिळाली असली तरीही अनेक कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत गेल्याकाही वर्षात प्रचंड वाढ झाली आहे. जेबीएम ऑटो लिमिटेड ही अशीच एक कंपनी असून, याच्या शेअर्सच्या किंमतीत मागील 5 वर्षात जवळपास 2700 टक्के वाढ दिसून आली आहे.
आज (24 मार्च) जेबीएम ऑटो लिमिटेडच्या शेअर्सची किंमत 18 टक्क्यांपेक्षा अधिक वाढली. कंपनीचे शेअर्स 673 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. यासोबतच, हा शेअर निफ्टी500 इंडेक्समध्ये देखील टॉप गेनर ठरला आहे. मागील 5 दिवसातच शेअर्सच्या किंमतीत 30 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.
महिंद्रा अँड महिंद्राचे संचालक मंडळ कंपनीतील हिस्सा खरेदी करण्यासाठी चर्चा करत असल्याचे वृत्त आल्यामुळे जेबीएम ऑटो लिमिटेडच्या शेअर्सच्या किंमतीत तेजी दिसून आली.
मागील वर्षभरात कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत जवळपास 27 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. मात्र, मागील 5 वर्षांचा विचार करता यात प्रचंड तेजी पाहायला मिळाली. 5 वर्षात कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 2700 टक्क्यांनी वाढली आहे. 1 फेब्रुवारी 2020 ला कंपनीच्या शेअर्सची किंमत 49 रुपये होती. तर 24 मार्च 2024 रोजी हे शेअर्स 663 रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
जेबीएम ऑटो लिमिटेडचे शेअर्स मागील 52 आठवड्यात 1169.38 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. तर शेअर्सची 52 आठवड्यातील नीचांकी पातळी 489.80 रुपये होती. जेबीएम ऑटो लिमिटेडबद्दल सांगायचे तर ही कंपनी ई-मोबिलिटी क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनी शीट मेटल कंपोनेंट, टूल्स, डाय आणि मोल्ड्सची विक्री करते. याशिवाय, बससंबंधित पार्ट्सची देखील कंपनीकडून विक्री केली जाते.
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)