Jaykumar Rawal : धुळे जिल्ह्यात सोशल मीडियावर राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांचा मॉर्फ (बनावट) फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी धुळे सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून व्हॉट्सॲपसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात होता. या फोटोमध्ये मंत्री रावल यांच्यासोबत नाशिकमधील आरोपी अशोक खरात असल्याचे दाखवण्यात आले होते.Jaykumar Rawal तक्रारदाराला संशय आल्याने फोटोची सत्यता पडताळण्यात आली. तपासात मूळ फोटोमध्ये छेडछाड करून तो मॉर्फ केल्याचे स्पष्ट झाले. संबंधित फोटोचा वापर करून मंत्र्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. Jaykumar Rawal Jaykumar Rawal : महाराष्ट्रात खळबळ..! भाजप मंत्र्यांचा खरातसोबतचा ‘तो’ मॉर्फ फोटो व्हायरल; पोलिसांकडून गुन्हा दाखल सायबर पोलिसांनी अत्याधुनिक तांत्रिक साधनांच्या मदतीने तपास करत हा फोटो पूर्णपणे बनावट असल्याचे सिद्ध केले आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. Jaykumar Rawal दरम्यान, पोलिसांनी सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.