राजकोट – जयदेव उनादकट याच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्रने शुक्रवारी प्रथमच रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेतेपदाच्या लढतीत सौराष्ट्रने बंगालवर पहिल्या डावात घेतलेल्या 44 धावांच्या आघाडीच्या जोरावर रणजी करंडक 2019-20 स्पर्धेचा अंतिम सामना जिंकला.
Winners are grinners! ??@JUnadkat and Co. celebrate Saurashtra’s #RanjiTrophy triumph. ??
Report ? https://t.co/sRmzuHf0mo@paytm #SAUvBEN @saucricket pic.twitter.com/2O40BhajFE
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 13, 2020
सौराष्ट्रने गेल्या 8 वर्षाच्या कालावधीत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली होती, पण चारही वेळेस त्यांना अपयश हाती आलं होतं. त्यानंतर आज बंगालवर मात करत अखेर त्यांनी विजेतेपद पटकावले. तर बंगलाने 1989-90 साली रणजी करंडक स्पर्धा जिंकली होती. तीस वर्षानंतर यंदा त्यांना पुन्हा एकदा विजेतेपद पटकविण्याची संधी होती, मात्र त्यांना अपयश आलं.
Saurashtra are the @paytm #RanjiTrophy 2019-20 Champions! ??
Bengal put up a solid fight in the #Final and had a fine season. ?? #SAUvBEN
Scorecard ? https://t.co/LPb46JOjje pic.twitter.com/NH0SZbLStM
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 13, 2020
सौराष्ट्रने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांनी पहिल्या डावात 425 धावांपर्यत मजल मारली होती. प्रत्युत्तरात बंगालचा पहिला डाव 381 वर आटोपला. त्यामुळे सौराष्ट्राला पहिल्या डावात 44 धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर सामन्याच्या अखेरच्या दिवशी दुसऱ्या डावात सौराष्ट्राच्या 4 बाद 105 धावा झाल्या असताना पंचानी खेळ थांबविला आणि सौराष्ट्राने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
विजेतेपदाच्या लढतीत अर्पित वासवदा आणि शेल्डन जॅक्सनया फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. रणजी स्पर्धेच्या या मोसमात सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनादकटने दमदार कामगिरी करत 13.23 च्या सरारीने 67 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक – सौराष्ट्र पहिला डाव – सौराष्ट्र पहिला डाव – 171.5 षटकांत सर्वबाद 425. (अर्पित वासवदा 106, चेतेश्वर पुजारा 66, अवी बारोट 54, विश्वराज जडेजा 54, चिराग जानी 14, धर्मेंद्रसिंह जडेजा नाबाद 33, जयदेव उनाडकट 20, आकाश दीप 4-98, शाहबाज अहमद 3-103, मुकेश कुमार 2-103) आणि सौराष्ट्र दुसरा डाव – अवी बोराट 39, एच देसाई 21, विश्वराज जडेजा 17, शेल्डन जॅक्सन नाबाद 12, आकाशदीप 1-13, शाहबाज अहमद 2-33) विरूध्द बंगाल पहिला डाव – 161 षटकांत सर्वबाद 381. (सुदीप चटर्जी खेळत आहे 81, सुदीप कुमार 26, मनोज तिवारी 35, वृद्धिमान साहा 64, अनुस्तुप मुजुमदार 63, अर्णब नंदी नाबाद 40, जयदेव उनादकट 2-96, प्रेरक मांकड 2-45, धर्मेंद्रसिंह जडेजा 3-114).