जयंती आगरकरांची फोटो टिळकांचा; पडळकरांची ‘ती’ पोस्ट व्हायरल

पुणे – हल्ली समाजमाध्यमांवर कोणतीही पोस्ट करत असताना त्याबाबत खात्री करून घेणं गरजेचं झालंय. अशी काळजी न घेतल्यास आपल्याकडून चुकीची अथवा खोटी माहिती पसरवली जाण्याचा धोका निर्माण होतो. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना याबाबत थोडं अधिकच सतर्क राहणं योग्य. खास करून राजकीय पुढाऱ्यांच्या सोशल मीडियावर गुंजभरही चूक झाल्यास त्याचे ‘स्क्रीन शॉट’ क्षणार्धात व्हायरल होत असतात.

सोशल मीडियाच्या विवेकी वापराबाबत इथे सांगण्याचे कारण की, आज अशीच एक चूक भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज गोपाळ गणेश आगरकरांची जयंती. जयंती निमित्ताने आमदार पडळकरांनी आगरकरांना अभिवादन केले. मात्र यावेळी त्यांनी शेअर केलेल्या फोटोवर लोकमान्य टिळकांचा फोटो लावला.

पडळकरांनी केलेल्या या चुकीमुळे आज सोशल मीडियावर त्यांच्याच पोस्टची चर्चा सुरु होती.

Leave A Reply

Your email address will not be published.