राज्यपालांना सादर करण्यात आलेल्या पत्रात अतिज पवारांच्या नावाचाही उल्लेख
मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षाच्या घडामोडीत वेगवेगळे वळण मिळत आहे. त्यातच आज राष्ट्रवादीचे कॉंग्रेसते नेते जयंत पाटील यांनी आमदारांच्या पाठींब्याचे पत्र राजभवनात सादर केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची यादी राजभवनात दिली असल्याचे पाटील यांनी म्हटले.
दरम्यान, आज दुपारी अडीच वाजता राष्ट्रवादीची दुसरी बैठक होईल. या बैठकीत आमचे काल गैरहजर असलेले नेते उपस्थित असतील. आता अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी आता त्यांच्या घरी जात असल्याचे पाटील म्हणाले.
Jayant Patil, NCP: I have presented him a letter about the meeting which took place yesterday of NCP legislative party. https://t.co/Ojg4XDlxLi pic.twitter.com/MYx6jPF8rx
— ANI (@ANI) November 24, 2019
आम्ही राज्यपालांना दिलेल्या आमदारांच्या यादीत अजित पवार यांचे देखील नाव आहे. ते परततील असा विश्वास असल्याचे जयंत पाटील म्हणाले. सर्वच्या सर्व आमदार आमच्या संपर्कात आहेत. केवळ अजित पवार बाहेर आहेत. अजित पवार पुन्हा येतील असं तुम्हाला वाटतं का ? असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी ‘कोशिश करने वालोंकी कभी हार नही होती’ अशी प्रतिक्रिया दिली.
आज सर्वोच्च न्यायालयात राज्यात तडकाफडकी स्थापन करण्यात आलेल्या सरकारवर आक्षेप घेणाऱ्या याचिकांवर सुनावणी केली. त्यात राज्यपालांना कोणते कागदपत्र सादर करण्यात आले ती न्यायालयात सादर करावीत असे आदेश देत उद्या पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.