राज्यातील सर्व वर्गांना निराश करणारा अर्थसंकल्प – जयंत पाटील

मुंबई: लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने आज बुधवारी सन २०१९-२० या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर केला.

हा अर्थसंकल्प सर्व वर्गांना निराश करणारा अर्थसंकल्प आहे, अशी टीका माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

हा अर्थसंकल्प युवक, शेतकरी, मध्यमवर्गीय, जेष्ठ नागरिक, दलित या साऱ्याच घटकांची निराशा करणारा आहे. निवडणुकीपूर्वीचा अर्थसंकल्प म्हणून राज्यातील जनतेला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या मात्र सरसकट सर्व जनतेची निराशा या सरकारने केली आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ‘राज्यात सध्या भयावह दुष्काळ पडलेला असताना हे सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना जाहीर करेल असे अपेक्षित होते, मात्र कोणतीही ठोस योजना जाहीर केलेली नाही, विविध महत्वाच्या योजनांसाठी केलेल्या तरतुदी अत्यंत अपुऱ्या आहेत’.

‘अनुसूचित जाती उपयोजनेसाठी केलेली ९२०८ कोटी रुपयांची तरतूद अत्यंत अपुरी आहे, यापूर्वी अनुसूचित जाती उपयोजनेत तरतूद करून तो निधी दुसऱ्याच कारणांसाठी वापरण्याचे प्रकार झाले आहेत, यावर्षीही तसेच घडण्याची दाट शक्यता आहे’.

‘युवकांना रोजगार देण्याचे गाजर दाखवून सत्तेत आलेल्या या सरकारने युवकांच्या रोजगारासाठी अर्थसंकल्पात कोणतीही योजना सादर केलेली नाही. अर्थमंत्र्यांनी राज्यातील १८ ते ३५ वयोगटातील किती व्यक्तींना रोजगार मिळाला हे जाहीर करणे अपेक्षित होते,त्यावर ते काहीही बोलले नाहीत’.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)