जयंत पाटील यांच्याकडे महाराष्ट्र चालवण्याची क्षमता – शरद पवार

सांगली : आज महाराष्ट्र चालवू शकतील असा माणूस म्हणून आपण जयंत पाटील यांच्याकडे पाहतो, अशा शब्दात राष्ट्रवादीचे पुढील मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील असतील असे सूचक वक्‍तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. इस्लामपुरात माजी मंत्री राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

राज्याचा कारभार अत्यंत व्यवस्थितपणे सांभाळू शकतील असे राज्यात हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच माणसे सध्या आहेत. त्यांच्यातच आपण जयंत पाटील यांना अग्रस्थानी मानतो असे सूचक वक्‍तव्य त्यांनी केले. जयंत पाटील यांच्याकडे राज्याची जबाबदारी आहे मागच्या 30 वर्षात तुम्ही त्यांना उत्तमपणे साथ दिली तशीच साथ त्यांना कायम द्या असे आवाहनही यावेळी शरद पवार यांनी केले. दरम्यान, या कार्यक्रमासाठी सुशिलकुमार शिंदे, विद्यार्थी नेते कन्हैय्याकुमार, आमदार जितेद्र आव्हाड, आमदार सुमनताई पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)