न्हावरे/ वार्ताहर – शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक अमोल मिटकरी यांची शनिवारी (दि.१२) दुपारी १२:३० वाजता शिरुर येथील पाच कंदील चौकात जाहीर सभा होणार आहे.
यावेळी जयंत पाटील व अमोल मिटकरी राज्यातील विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती शिरुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र काळे यांनी दिली.
यावेळी शिरुर, हवेली तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.