Jaya Bachchan | बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन त्यांच्या तापट स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा त्या पापाराझीवर संतापल्याचे पाहायला मिळाले आहे. यावरून त्यांना सोशल मीडियावर अनेकडा ट्रोलही केले जाते. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जया बच्चन पापाराझींवर नेहमीसारख्या संतापल्याचे दिसले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जया बच्चन यांनी पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. जेव्हा जया बच्चन एका इव्हेन्टमध्ये पोहचतात, तेव्हा पापाराझीने त्यांना ‘जया जी नमस्ते’ असे म्हंटले. तेव्हा जया बच्चन देखील ‘नमस्ते’ म्हणतात.
View this post on Instagram
त्यानंतर एका पापाराझीने जया बच्चन यांना म्हंटले की, ‘तुम्ही खूप सुंदर दिसत आहेत मॅडम’. ते ऐकताच जया बच्चन यांनी आश्चर्यचकित होत विचारलं. ‘कोण बोललं? नाव सांग त्याचं?’ तेव्हा एक पपाराझी म्हणाला की, ‘मी बोललो’ त्यावर जया बच्चन यांनी उत्तर देत म्हटलं की, ‘तु म्हणालास, वॉव..’ त्या असं म्हणतात सगळे हसायला लागतात.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून एका नेटकऱ्याने कमेंट्स करत म्हटलं की, ‘देवाचे आभार माना… त्यांचा मुड चांगला होता’ तर दुसऱ्याने म्हटलं की, ‘हाहाहा.. किती प्रेमाने त्यांनी विचारलं’. तर काहींनी त्यांच्या नमस्ते बोलण्याच्या अनोख्या पद्धतीचे देखील कौतुक केले आहे.
हेही वाचा:
आता बस्स झालं…! भारतात पाक प्रचाराला ब्रेक ; शोएब अख्तरसह 16 न्यूज यूट्यूब चॅनेलवर बंदी