सध्या बच्चन कुटुंब त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. ते सोशल मिडिया पोस्ट, कार्यक्रमांना वेगवेगळी हजेरी लावत असल्याने या चर्चानी अजून वेग धरला आहे. या सगळ्यामुळे त्यांच्या नात्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना जया बच्चन यांच्या एका जुन्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
काय म्हणाल्या जया बच्चन ?
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन 2007 मध्ये लग्नगाठ बांधली आणि काही वर्षांनी त्यांनी त्यांची मुलगी आराध्याला जन्म दिला. लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात काहीच अलबेल नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या. या सगळ्या दरम्यान जया बच्चन यांनी सांगितले की, अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला कधीही त्यांच्या सून सारखे वागवले नाही.
जया बच्चन एकदा करण जोहरच्या वादग्रस्त चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये दिसल्या होत्या. यादरम्यान जया बच्चन यांनी खुलासा केला होता की, जेव्हा श्वेता बच्चन लग्न करून घराबाहेर पडली तेव्हा अमिताभ बच्चन यांना त्यांच्या आयुष्यात पोकळी जाणवली. ऐश्वर्या त्यांच्या घरी आल्यावर त्यांची मुलगी होण्याची इच्छा पूर्ण झाली, अमिताभ नेहमीच ऐश्वर्याला आपली सून नव्हे तर आपली मुलगी मानतात.