जवानाचा अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने विवाह

तीन दिवसांची कोठडी : पीडितेच्या वडिलांसह आजीवर गुन्हा

बारामती -सैन्यदलात नोकरीला असलेल्या जवानाने येथील अल्पवयीन मुलीशी बळजबरीने विवाह केला. याप्रकरणी त्याच्यासह पीडितेचे वडील व आजीविरोधात शहर पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या दुसऱ्या फिर्यादीवरुन सैन्य दलातील या जवानाविरोधात बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार अन्य एक गुन्हा दाखल करण्यात आला असून जवानाला पोलिसांनी अटक केली असून त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

श्रीमंत साबू काळेल (वय 32, रा. हर्नाळ, ता. तिकोट, जि. विजापूर, कर्नाटक), असे कोठडी सुनावलेल्याचे नाव आहे. तर अन्य दोन आरोपींमध्ये पीडितेचे वडील व आजी (आईची आई) यांचा समावेश आहे. यातील काळेल याला अटक करण्यात आली आहे. सैन्यदलात तो बेळगाव येथे कार्यरत असल्याची माहिती माहिती तपास अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक अश्‍विनी शेंडगे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी काळेलने दि. 22 एप्रिल 2019 रोजी संध्याकाळी साडेसात वाजता हर्नाळ येथील महादेव मंदिरात तिच्याशी बालविवाह केला. सैन्यदलातील आरोपी, वडील व आजीच्या दबावामुळे इच्छेविरोधात हा विवाह करावा लागला असल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, याप्रकरणी पीडितेने दाखल केलेल्या दुसऱ्या फिर्यादीनुसार आरोपी काळेलने बालविवाह झाल्यानंतर दि. 25 एप्रिल 2019 रोजी हे कुटुंब बारामतीतील जळोची येथे आले.

दुसऱ्यादिवशी दि. 26 एप्रिलपासून ते 3 मे 2019 पर्यंत आरोपी काळेल या फिर्यादीच्या घरीच मुक्‍कामी होता. त्याने फिर्यादीवर अत्याचार केला. तिने प्रतिकाराचा प्रयत्न केला असता त्याने तिला मारहाण केली. ही बाब पीडितेने आईला सांगितल्यावर आईने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने जीवे मारून टाकीन, अशी धमकी त्याने दिली. प्रचंड दबावाखाली फिर्यादी व तिची आई होती. त्यानंतर दि. 16 जानेवारीपर्यंत त्याने तिच्या घरी येत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. फिर्यादीने नकार दिला असता तुझी बदनामी करतो, घरादाराचे वाटोळे करतो अशी धमकी देत तो निघून गेला. वारंवारच्या त्रासाला कंटाळून अखेर फिर्यादीने तक्रार दाखल केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.