नवी दिल्ली – तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार जवाहर सरकार यांनी गुरुवारी राजीनामा दिला. कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्याप्रकरणावरून ते ममता सरकारवर नाराज होते. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.
जवाहर सरकार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, आज संसद भवनात भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. आता मी बोलायला आणि लिहायला मोकळा आहे. आता मी हुकूमशाही, जातीयवाद आणि भ्रष्टाचाराविरुद्धचा माझा लढा आणखी मजबूत करेन. जवाहर सरकार यांनी X वर जगदीप धनखर यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.
My time is up, Sir!
Handed over my resignation latter as MP to India’s Vice President and Chairman Rajya Sabha, Shri Jagdeep Dhankar today in Parliament House.
Free now to speak and write.
Will strengthen my fight authoritarianism, communalism and corruption. pic.twitter.com/kR9Bn0MIQA— Jawhar Sircar (@jawharsircar) September 12, 2024
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी जवाहर यांना फोन केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी राज्यसभा पद आणि राजकारण सोडण्याचा सरकारचा निर्णय बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर खासदार जवाहर यांनी राजीनामा दिली आहे.