#Tokyo2020 : भारताचा भालाफेकपटू शिवपाल सिंह ऑलिम्पिकला पात्र

नवी दिल्ली – भारताचा भालाफेकपटू शिवपाल सिंह याने अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत टोकोयो ऑलिम्पिकची पात्रता पटकावली. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या एथलेटिक्स स्पर्धेत त्याने 85.47 मीटर भालाफेक करत पात्रता मिळवली.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळविण्यासाठी 85 मीटरचा निकष शिवपाल सहज पार केला. शिवपाल आता नीरज चोप्रासह ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करेल.

दरम्यान, नीरज चोप्रा याने जानेवारी 2020 मध्ये झालेल्या अॅककन अॅथलेटिक्स स्पर्धेत 87.86 मीटर भालाफेक करत टोकियो ऑलिम्पिकची पात्रता मिळवली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.