नवी दिल्ली – नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतसह देशभरात या सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून आंदोलनं केली जात आहेत. देशातील अनेक भागातून हजारो लोक या आंदोलनात सामिल झाले असून, त्यामध्ये अनेक अभिनेते, दिगर्दशक उपस्थीत आहे.
दरम्यान, नागरिकत्वच्या विरोधात अभिनेते जावेद जाफरी यांनी सुद्धा अनेकदा सोशल मीडियावर भाष्य केलं होत. मात्र, त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं. या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागत असल्यामुळे जावेद यांनी एक ट्विट केलं असून, आपण सोशल मीडियाला सोडत आहे. परिस्थिती सुधारल्यास परत येईल. असं त्यांनी म्हंटलं.
Can’t handle this trolling and hate.. going off social media till the situation improves.. hopefully..Inshallaah..#indiafirst #jaihind
— Jaaved Jaaferi (@jaavedjaaferi) December 22, 2019