नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सेंगर याला शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सत्र न्यायलयाने ठोठावली. त्याला 25 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. 2017मध्ये उन्नाव बलात्कार प्रकरणात सेंगर दोषी असल्याचे सोमवारी जाहीर करण्यात आले होते. त्याला शिक्षा शुक्रवारी ठोठावण्यात आली. याच पार्श्वभूमी बॉलिवूडचे गीतकार – लेखक जावेद अख्तर यांनी ट्विट केले आहे.
Kuldeep Sengar the rapist has been given life term by the court . Now let’s see how soon he gets unwell and is shifted to a hospital .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) December 21, 2019
जावेद अख्तर यांनी ट्विट केले आहे की,’रेपिस्ट कुलदीप सेंगर याला जन्मठेपेची शिक्षा सत्र न्यायलयाने ठोठावली आता बघू या तो किती लवकर अस्वस्थ होऊन हॉस्पिटलमध्ये दाखल होतो.’ सध्या या ट्विट सोशल मीडियावर युजर्सकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असून या ट्विटला युजर्सकडून रिट्विटही केले जात आहे. तसेच, न्यायलयाने ठोठावलेल्या शिक्षेवर सोशल माध्यमांमध्ये निषेध पूर्ण प्रतिक्रिया दिसून येत आहे.