शेखर कपूरच्या ट्विटवर भडकले जावेद अख्तर

मुंबई – जावेद अख्तर कशावर तरी नाराज झाले, असे फारच कमी वेळा होते. त्यांना रागावलेले फारच कमी जणांनी बघितले असावे. मात्र शेखर कपूरच्या एका ट्‌विटवर जावेद अख्तर जाम भडकले. त्यांनी शेखर कपूरला चक्क एखाद्या चांगल्या सायकॅट्रीस्टकडे जाण्याचा सल्ला दिला.

शेखर कपूरने असे काय भयानक ट्‌विट केले होते ? तर आपल्याला या देशात “रेफ्युजी’ झाल्यासारखे वाटायला लागले आहे. इथल्या बुद्धीजीवांची आपल्याला भीती वाटते आहे. जन्मापासून आपल्याला असे रेफ्युजी असल्यासारखेच वाटत होते. पण सिनेमामुळे इथल्या बुद्धीवंतांनी आपल्याला जवळ घेतले. पण अजूनही आपल्याला “साप चावण्यासारखी’ काही बुद्धीवंतांची भीती वाटते, असे शेखर कपूरने म्हटले होते.

त्यावर जावेद अख्तरनी शेखर कपूरला प्रश्‍न केला की कोणत्या बुद्धीवंतांची भीती वाटते ? शाम बेनेगल, आदूर गोपालकृष्ण, रामचंद्र गुहा ? शेखर कपूर, तुम्हाला मानसोपचारतज्ञाची गरज आहे. एवढेच नव्हे, तर स्वतःल रेफ्युजी समजणारे स्वतःला भारतीय समजत नाहीत, मग पाकिस्तानमध्ये रेफ्युजी असल्यासारखे वाटणार नाही का? काही दिवसांपूर्वी “मॉब लिंचींग’ प्रकरणी पंतप्रधानांना 62 कलाकारांनी पत्र पाठवले होते. त्याला शेखर कपूरने उत्तर दिले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.