पीएम मोदी चित्रपटाच्या पोस्टर वर जावेद अख्तर यांनी व्यक्त केले आश्चर्य…

मुंबई – बहुचर्चित ‘पीएम मोदी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. तीन मिनिटाच्या या ट्रेलरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. परंतु या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये नाव आल्याबद्दल गीतकार जावेद अख्तर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच आपण या चित्रपटासाठी कोणतेही गीत लिहिले नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

या चित्रपटात मोदींचा त्यांच्या लहानपणापासून ते पंतप्रधान बनण्यापर्यंतचा प्रवास दाखविण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकजणांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. त्यावर आज प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून ट्विट करत,”पीएम मोदी चित्रपटाच्या पोस्टर मध्ये आपले नाव आल्याबद्दल आश्चर्य वाटले.” असे म्हंटले आहे. पुढे त्यांनी या चित्रपटात गीत लिहिले असल्याचा नकार दिला आहे.

https://twitter.com/Javedakhtarjadu/status/1109064986729635841

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)