मुंबई – प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर सध्या पाकिस्तानात दिलेल्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. लाहोरमध्ये, अख्तर यांनी 26/11 हल्ल्यावरून पाकिस्तानला लक्ष्य केले. जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावतने त्यांचे जोरदार कौतुक केले होते. घरात घुसून मारले आहे असं कंगना यावेळी म्हणाली होती यावर आता जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानातील लाहोर येथे झालेल्या कार्यक्रमातून जावेद अख्तर परतले आणि त्यांनी भारतीय मीडियाशी संवाद साधला. यावेळी अख्तर यांना कंगना राणावत बाबत विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी उत्तर देण्याचे टाळण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा विचारले असता त्याने सांगितले की, कंगनाला आम्ही जास्त महत्व देत नाही, मग त्यांनी काय म्हंटले याकडे कशाला लक्ष देऊ. सोडा आता पुढे बोलू असं म्हणत अख्तर यांनी पुढचा प्रश्न विचारावा असा सूचक इशारा दिला.
काय म्हणाली होती कंगना
कंगनाने आपला व्हिडिओ शेअर करताना जावेद अख्तर यांचे कौतुक केले होते. अभिनेत्रीने लिहिले की, “जेव्हाही मी जावेद साहेबांची कविता ऐकायचो तेव्हा मला वाटायचे की सरस्वती मातेची त्यांच्यावर इतकी कृपा कशी आहे. पण बघा, माणसात काही तरी सत्य आहे, म्हणूनच त्याच्याकडे खणखणीतपणा आहे..जय हिंद. जावेद साहेब.. घरात घुसून मारले होते.”
काही वर्षांपूर्वी जावेद अख्तर आणि कंगना चांगलेच चर्चेत आले होते, जेव्हा दोघांमधील वाद झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दोघांमधील वाद इतका वाढला होता की जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्याचवेळी, आता अभिनेत्रीने केलेलं कौतुकाच सर्वांनाच आश्चर्य वाटले होते.