महाराष्ट्रासाठी भुपिंदर यादव यांची नियुक्ती
नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी सुरू केली असून त्यांनी निवडणूक होणाऱ्या राज्यांसाठी पक्षाचे मुख्य निरीक्षकांच्या नेमणुका सुरू केल्या आहेत. आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली विधानसभेसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली असून दुसरे केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यांची हरियानासाठी निवड करण्यात आली आहे.
झारखंडसाठी ओपी माथुर आणि महाराष्ट्रासाठी भुपिंदर यादव यांची निवड करण्यात आली आहे.त्यांना महाराष्ट्रात सह निवडणूक प्रमुख म्हणून दिल्लीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि कर्नाटकातील भाजपचे नेते लक्ष्मण सेवादी हे मदत करणार आहेत. भाजपला हरियाना, महाराष्ट्र आणि झारखंडची सत्ता कायम ठेवण्याची कसोटी पार पाडायची आहे तर दिल्लीत त्यांना आम आदमी पक्षाकडून सत्ता ताब्यात घेण्यासाठी चुरशीची लढत द्यायची आहे.