जस क्रिकेट संघाचा विजय

जस क्रिकेट अकादमी करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धा

पुणे -उबेद भट याने केलेल्या नाबाद 41 धावांच्या खेळीच्या जोरावर जस क्रिकेट अकादमी संघाने संजय क्रिकेट अकादमी संघाचा 9 गडी राखून पराभव करत येथे होत असलेल्या युनायटेड स्पोर्टस क्‍लब आणि जस क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित जस क्रिकेट अकादमी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित टी-20 प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत विजयी सलामी दिली.

साखळी फेरीत संजय क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण संजय क्रिकेट अकादमीचे सुरुवातीचे फलंदाज झटपट बाद झाले. सामन्यात 49 धावात 5 गडी बाद अशी स्थिती असताना संजय क्रिकेट अकादमीच्या मिहीर शहाणे 18 धावा, पृथ्वी सिंग 12 धावा यांनी थोडासा प्रतिकार केला. मात्र, त्यांना 15.5 षटकांत सर्वबाद 66 धावांचीच मजल मारता आली. जस क्रिकेट अकादमी संघाकडून आलोक बोबडे (1-2), तनिष्क सिंग (1-8), विशाल जाधव (1-9), क्रिधा सिंग (1-12) यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून संघाच्या विजयाचा पाया रचला. हे आव्हान जस क्रिकेट अकादमी संघाने केवळ 8.5 षटकांत 1 गडयाच्या मोबदल्यात 67 धावा करून पूर्ण केले.

सविस्तर निकाल

साखळी फेरी – संजय क्रिकेट अकादमी – 15.5 षटकांत सर्वबाद 66 (मिहीर शहाणे 18, पृथ्वी सिंग 12, आलोक बोबडे 1-2, तनिष्क सिंग 1-8, विशाल जाधव 1-9, क्रिधा सिंग 1-12) पराभूत वि. जस क्रिकेट अकादमी – 8.5 षटकांत 1 बाद 67 (उबेद भट नाबाद 41, साहिल भोसले नाबाद 8, आदित्य शिंदे 1-2). सामनावीर-उबेद भट.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.