नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या ऑस्ट्रेलियामध्ये इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सिरीजमध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि उपकर्णधार जसप्रीत बुमराह याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. चला तर मग या विक्रमांबद्दल जाणून घेऊयात..
जसप्रीत बुमराहने ‘हे’ विक्रम केले नावावर
बुमराहने रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत पर्थमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवून दिला. बुमराह यासह ऑस्ट्रेलियात अजिंक्य रहाणे नंतर पहिल्याच सामन्यात विजय मिळवून देणारा पहिला कर्णधार ठरला.
बुमराहने दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी 6 डिसेंबरला उस्मान ख्वाजा याला आऊट करत ऑस्ट्रेलियाला पहिला झटका दिला. बुमराह यासह टीम इंडियासाठी एका वर्षात 50 विकेट्स घेणारा कपिल देव आणि झहीर खान यांच्यानंतर तिसरा गोलंदाज ठरला.
बुमराहने दुसऱ्या कसोटी सामन्यात उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी आणि स्टीव्हन स्मिथ यांची घेत टीम इंडियासाठी एका वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. यासह त्याने श्रीरामपूर एक्सप्रेस झहीर खान याचा 50 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड उद्धवस्त केला. झहीरने 2002 साली 50 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र आता बुमराहरने झहीरला मागे टाकलं आहे.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, रवीचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.