चेन्नई – कर्णधार ज्यो रूटने श्रीलंकेतील फॉर्म भारतातही कायम ठेवताना दमदार नाबाद शतकी खेळी केली. आपल्या कारकिर्दीतील शंभरावा कसोटी सामना खेळत असलेल्या रूटने शतक साकार केले. शुक्रवारी पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 3 गडी गमावून 263 अशी आश्वासक मजल मारली आहे. रूट 128 धावांवर नाबाद असून डॉमनिक सिबली 87 धावांवर बाद झाला.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत तीन वर्षांपूर्वी जसप्रीत बुमराहने कसोटी पदार्पण केले होते. घरच्या मैदानावर पहिली कसोटी खेळण्यापूर्वी परदेशात सर्वाधिक कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने विश्वविक्रमाची बरोबरी केली. बुमराहने इंग्लंडविरूद्ध शुक्रवारी भारतात आपली पहिली कसोटी खेळली. याआधी त्याने परदेशात तब्बल 17 कसोटी सामने खेळले. घरच्या मैदानापूर्वी परदेशात सर्वाधिक कसोटी खेळणाचा विक्रम वेस्ट इंडिजच्या डॅरेन गंगाच्या (17) नावावर होता. त्या विक्रमाशी बुमराहने बरोबरी केली. बुमराहने आणखी एक विक्रम केला. घरच्या मैदानावर पहिली कसोटी खेळण्याआधी सर्वाधिक गडी मिळवण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर नोंदला गेला आहे. पहिला कसोटी सामना सुरू होण्याआधी बुमराहच्या नावावर 79 कसोटी बळी होते. ही कामगिरी वेस्ट इंडिजच्याच अल्फ व्हॅलेंटाइन यांच्या नावावर होती. त्यांने मायदेशात पहिली कसोटी खेळण्यापूर्वी परदेशात 65 कसोटी बळी घेतले होते.
पंतने महत्वाचा झेल सोडला….
या सामन्यात पहिले षटक बुमराने टाकले. त्याच्या पहिल्याच चेंडूवरमायदेशात कसोटीतील पहिलाच बळी घेण्याची त्यांची संधी मात्र,हूकली. डावातील पहिलाच चेंडू लेग साईडला मारण्याचा इंग्लंडचा सलामीवीर रॉरी बर्न्स प्रयत्न करत होता. पण यावेळी त्याच्या बॅटची कड घेत चेंडू यष्टीरक्षक पंतच्या दिशेने आला.पंतने सूर मारला मात्र, त्यालाझेल घेताल आला नाही. पंतने जेव्हा त्याला जीवदान दिले तेव्हा तो केवळ एका धावेवर खेळत होता. त्याने 33 धावांची खेळी केली.