‘या’ अभिनेत्रीवर जडला जसप्रीत बुमराहचा जीव

मुंबई- क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वाचं नातं हे नवीन नाही. अनेक दिग्ज क्रिकेटर बॉलिवुडच्या अभिनेत्रींनबरोबर विवाहबंधनात अडकले असल्याचे असंख्य उदाहरणं आहेत. हरभजन-गीता आणि विराट-अनुष्का असे अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यांसमोर आहेत. तर त्यातील काहींचं जुळता-जुळता राहून देखील गेलं आहे.

दरम्यान, टीम इंडियाचा धडाडीचा गोलंदाज ‘जसप्रीत बुमराह’ याचा देखील एका अभिनेत्रीवर जीव जडला असल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री ‘अनुपमा परमेश्वरम’वर सध्या जसप्रीतचा जीव जडला आहे. जसप्रीत आणि अनुपमा यांनी ट्विटरवर एकमेकांना फॉलो देखील केले आहे. ‘प्रेमम’ या मल्ल्याळम चित्रपटामुळे अनुपमा प्रकाशझोतात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here