इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी जसप्रीत बुमराह सज्ज 

कोणत्याही परदेश दौऱ्यापूर्वी अचूक नियोजन 

लंडन: इंग्लंडचा दौरा हा कोणत्याही परदेशी खेळाडूसाठी आव्हानात्मक असतो. भारताचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मात्र या नव्या आव्हानासाटी उत्सुक आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक नव्या परदेश दौऱ्यासाठी आपण अचूक नियोजन करण्यावर भर देतो, असे त्याने म्हटले आहे. तसेच नवनव्या देशांना भेट देताना त्या प्रदेशाचा सखोल अभ्यास करणेही आपल्याला आवडते, असे बुमराहने नमूद केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोणत्याही नव्या देशात जाताना तुमच्यावर पहिल्यांदा थोडे दडपण असतेच. परंतु तुम्हाला हळुहळू तो देश, तेथील लोक आवडायला लागतात आणि मग तुमच्या कामगिरीवरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो, असे सांगून बुमराह म्हणाला की, कोणत्याही नव्या देशाचा दौरा करण्यापूर्वी मी खूप आधीपासून त्यासाठी अभ्यास करतो. तेथील संघाची तयारी काय आहे, त्यांची बलस्थाने कोणती, त्यांचे कच्चे दुवे कोणते, याचा अभ्यास करण्यासाठी मी विविध व्हिडिओचा आधार घेतो. त्यानंतर मग एखादा दौरा दीर्घ कालावधीचा असला, तर तेथील विविध ठिकाणांना भेटी देणेही मला आवडते.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील भारताचा महत्त्वाचा गोलंदाज असलेल्या बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात कसटोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करतानाही चांगली कामगिरी केली. त्याने तीन कसोटींमध्ये 14 बळी घेतले. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो इंग्लंडविरुद्ध टी-20 आणि वन डे अशा दोन्ही मालिकांना मुकला. इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीपासूनच तो निवडीसाठी पात्र ठरेल. परंतु या कसोटी मालिकेसाठी तो भलताच उत्सुक आहे. कारण कसोटीसाठी स्वत:ला सिद्ध करण्याची त्याला ही मोठी संधी आहे.

बुमराहने याच वर्षी जानेवारीत कसोटी पदार्पण केल्यानंतर आतापर्यंत तीन कसोटी सामन्यांत 25.21 सरासरीने 14 बळी घेतले असून 37 एकदिवसीय सामन्यांत 22.50 सरासरीने 64 बळी टिपले आहेत. त्याने एका सामन्यांत चार बळी तीन वेळा, तर पाच बळी एकदा घेतले आहेत. तसेच त्याने 35 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 19.93 सरासरीने 43 फलंदाज बाद केले आहेत. बुमराहने जानेवारी 20116 मध्ये एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)