#CWC19 : शिखर धवन संघात नसणे दुर्दैवी – जसप्रीत बुमराह

साऊथदॅम्पटन – शिखर धवन विश्‍वचषक स्पर्धेमधून बाहेर जाणे हे दुर्दैवी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने केलेली खेळी विलक्षण होती. आमचा संघ सर्वोत्तम आहे, आणि आम्हाला सध्या कशाचीही चिंता नाहीये. झालेला प्रकार दुर्दैवी असला तरीही आम्हाला पुढचा विचार करणे भाग आहे. असे मत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने व्यक्त केले आहे.

तर, पुढे बोलताना बुमराह म्हणाला की, भुवनेश्वर कुमार संघात नसल्याचा परिणाम सध्या जाणवणार नाही. आम्ही नेहमी आमच्या जमेच्या बाजू लक्षात घेत असतो. ज्यावेळी भुवी सोबत असतो त्यावेळी रणनिती वेगळी आखली जाते, शमी सोबत असताना वेगळ्या रणनितीचा विचार होतो कधीकधी आम्ही तिघंही एकाच संघात खेळलो आहोत. त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टींवर आम्हाला लक्ष केंद्रीत करण्याची गरज नाहीये.

Leave A Reply

Your email address will not be published.