वॉशिंग्टन – जैश ए महंमद आणि इस्लामिक स्टेटशी संबंधीत एका दहशतवाद्याला आज येथील विमानतळावर अटक करण्यात आली. वकार उल हसन असे त्याचे नाव असून तो पाकिस्तानातून आला होता. तो नॉर्थ कॅरोलिनाच्या शारलिट डग्लस आंतराष्ट्रीय विमानतळावर त्याला अटक करण्यात आली. तो सन 2014 पासून जैश ए महंमद आणि इस्लामिक स्टेटशी संबंधीत होता. त्या संघटनांसाठी तो नेमके काय काम करीत होता याची अद्याप माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. तो अमेरिकेत असताना त्याची या आधीही दोन वेळा चौकशी झाली होती पण चौकशीत त्याने खोटी माहिती दिल्याचे लक्षात आले असून त्याला आज त्याच आधारे अटक करण्यात आली आहे. तो त्याच्या कुटुंबासह 1999 पासूनच अमेरिकेत राहात आहे. त्याला अमेरिकेचे नागरीकत्वही मिळालेले आहे. पण तो जैशच्या कामासाठी सातत्याने पाकिस्तानचा दौरा करीत असे.