‘विश’मध्ये जसलीन मथारू

“बिग बॉस’मध्ये भजन गायक अनुप जलोटांबरोबर सहभागी झालेल्या जसलीन मथारूने एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आपला जम बसवायला सुरुवात केली आहे. आता जसलीन “विश’मध्ये सहभागी होते आहे. या सिरीयलमध्ये जसलीन चक्क एका जलपरीच्या रोलमध्ये दिसणार आहे. तिचा सहभाग असलेला पहिला एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला.

“बिग बॉस’नंतर तिने आपल्याला ग्लॅमरस रोल मिळावेत, अशी अपेक्षाही व्यक्‍त केली होती. खरे तर लोकांनी आपली द्‌खल घ्यावी, प्रसिद्धी मिळावी, यासाठीच आपण आपल्यापेक्षा दुप्पट वयाने मोठ्या अनुप जलोटांबरोबर “बिग बॉस’मध्ये सहभागी झाल्याचेही तिने सांगितले होते. गेल्या वर्षभरापासून तिच्या वाट्याला असा ग्लॅमरस रोल आलेलाच नव्हता. मात्र आता तिला तिच्या पसंतीचा रोल मिळाला आहे. देबिना बॅनर्जी ही तिची सहकलाकार असनार आहे. देबिनाबरोबरचा एक फोटोही जसलीनने शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

😈😈 #VISH #COLORSTV #Jalakshini #colorstv #vishalvashishtha #debinabonnerjee @vishalvashishtha @colorstv Monday to Friday 10:30m

A post shared by Jasleen Matharu (@jasleenmatharu) on

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)