मुंबई : गायक आणि ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धक जसलीन मथारू आणि भजन सम्राट अनूप जलोटा सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओंमध्ये अनुप यांच्या बंदूकीच्या निशाण्यावर जसलीन दिसत आहे.
जसलीन सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असते. आता सुद्धा तिने चित्रपटातील ‘आप यहां आए किसलिए’ या गाण्यावर लिप्सिंग करताना एक व्हिडिओ शेअर केला आहे.
हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये ‘आप यहा आये किसलिए..’ असा प्रश्न अनुप यांना विचारला आहे.तर बिग बॉसनंतर रूपेरी पडद्यावर ही जोडी पुन्हा कल्ला करणार आहे. ‘वो मेरी स्टुडंट है’ या चित्रपटाच्या माध्यमातून हे दोघे चाहत्याचे मनोरंजन करणार आहेत. या चित्रपटाची कथा अनूप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या नात्या भोवती फिरताना दिसत आहे. या जोडीच्या चर्चा संपूर्ण देशभर पसरल्या होत्या.
त्याला कारणंही तसेचं होते, या दोघांमध्ये चक्क ३७ वर्षांचा अंतर होता. अनूप जलोटा आणि जसलीन दोघे तिन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण शोमधून बाहेर आल्यानंतर जसलीनने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिले.