मुंबई – पंजाबची कतरिना कैफ ते मुंबईची कतरिना कैफ असा प्रवास करणारी प्रसिद्ध पंजाबी गायिका आणि अभिनेत्री शहनाज गिल ही बिग बॉस 13 नंतर नेहमीच चर्चेत असते.
View this post on Instagram
बिग बॉस सीझन 13 मध्ये सहभागी झाल्यानंतर शहनाज गिलने तिच्या आयुष्यात मागे वळून पाहिले नाही. शोच्या आत सलमान खान तिला नेहमी करिअरबद्दल सल्ले देत असे. यामुळे बिग बॉस नंतरही तिने आपली जादू प्रेक्षकांच्या मनात कायम ठेवली आहे. जसजसा वेळ निघून गेला, तसतशी शहनाज तिच्या वेगळ्या आकर्षणाने लोकांची मने जिंकत गेली. त्यामुळे शहनाजची लोकप्रियता कमालीची वाढली आहे.
View this post on Instagram
शहनाज आणि सलमान खानची बॉन्डिंग अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळते. सध्या शहनाज गिल आणि सलमान खानचे नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. व्हिडिओ ईद सेलिब्रेशन पार्टीतील आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ सलमान खानची बहीण अर्पिता आणि आयुष शर्मा यांच्या ईद सेलिब्रेशन पार्टीतील आहे.
View this post on Instagram
शहनाज गिल आणि सलमान खानच्या ईद पार्टीचा हा क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शहनाज आणि सलमान खूप जवळ दिसून आले. शहनाज सलमानचे बॉन्डिंग चाहत्यांना खूप आवडले आहे. व्हिडिओमध्ये शहनाज नेहमीप्रमाणे सलमानशी बोलत आहे. आणि त्याला मिठी मारत आहे.
View this post on Instagram
पार्टी संपल्यानंतर सलमान खानही शहनाज गिलला तिच्या कारमध्ये सोडण्यासाठी आला. यादरम्यान, कारमध्ये बसताना शहनाजने सलमानच्या गालावर प्रेमाने हात ठेवला, आणि नंतर त्याला मिठी मारली नंतर कारमध्ये बसली. त्या दोघांची एकमेकांसाठी जपलेली क्यूट स्टाइल पाहून सोशलवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.