मंचर (प्रतिनिधी) – जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील झांजुरणेबाबा मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अकराशे अकरा पणत्या लावण्यात आल्याने मंदिर परिसर उजळून निघाला होता.
बाबुराव महाराज ढोबळे यांची प्रवचनरुपी सेवा तसेच श्रीराम प्रासादिक भजनी मंडळ यांचा कार्यक्रम पार पडला. ग्रामस्थांच्या वतीने अन्न प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पांडुरंग टाव्हरे यांच्या हस्ते मंदिरातील पुजारी चंद्रकांत सांडभोर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बारकु ढोबळे, डॉ. सुरेश टाव्हरे, नारायण टाव्हरे, कांताराम टाव्हरे, राजु वनवे, शिवाजी ढोबळे यांच्यासह भाविक उपस्थित होते.