टोकियो – जपानच्या संरक्षण मंत्रालयाने 2021 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 5.5 ट्रिलीयन येन इतक्या प्रचंड अंदाजपत्रकाची अपेक्षा केली आहे.
या प्रचंड अंदाजपत्रकामध्ये अमेरिकेच्या महगड्या लढाऊ विमानांचाही समावेश आहे. सायबर आणि अन्य संभाव्य धोक्यांचा विचार करता जपानने हे संरक्षण अंदाजपत्रक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
जपानचे नवनियुक्त पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्या नेतृत्वाखाली ही वाढीव संरक्षण अंदाजपत्रकाची मागणी करण्यात आली आहे. जपानच्या संरक्षण खर्चामध्ये 2013 पासून सलग 8 वर्षे वाढ होत आहे. चालू वर्षाच्या संरक्षण अंदाजपत्रकापेक्षा पुढील वर्षीच्या संरक्षण अंदाजपत्रकामध्ये 8 टक्क्यांची वाढ सुचवण्यात आली आहे.
जपानचे पूर्वीचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी जपानच्या अत्मसंरक्षणाच्या तरतूदींमध्ये वाढ करायचे धोरण स्वीकरले होते. आंतरराष्ट्रीय धोरणाला अनुसरून उत्तर कोरिया आणि चीनच्या संरक्षण खर्चाची कमान सतत वाढतच राहिली आहे. आबे यांच्यापेक्षा सुगा यांचे संरक्षण धोरण अधिक आक्रमक असल्याचेच हे निदर्शक आहे.