Japanese Prime Minister Resignation । जपानच्या पंतप्रधानांनी राजीनामा जाहीर केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. फुमियो किशिदा यांनी याविषयी माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या निर्णयाविषयी बोलताना, ते सप्टेंबरमध्ये पद सोडणार आहेत. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपणार आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासही त्यांनी नकार दिला आहे. जपानच्या सरकारी वृत्तवाहिनीने याला दुजोरा दिला आहे.
अध्यक्षपदासाठी निवडणूक न लढवण्याची घोषणा Japanese Prime Minister Resignation ।
एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, “फुमियो किशिदा यांनी सत्ताधारी पक्ष लिबरल डेमोक्रॅटिक (एलडीपी) च्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे.” ऑक्टोबर 2021 मध्ये फुमियो किशिदा यांनी जपानचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला होता. किशिदाने योशिहिदे सुगाची जागा घेतली होती. यंदा जपानमध्ये ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार आहेत. बुधवारी किशिदा यांनी पक्षाध्यक्ष म्हणून पुन्हा निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. पुढील महिन्यात एलडीपीच्या नव्या नेत्याची निवड होईपर्यंत ते पंतप्रधानपदावर राहतील. किशिदा यांनी पंतप्रधानपद सोडण्याचे मुख्य कारण पक्षातील वाद असल्याचे सांगितले जात आहे.
पद सोडण्यामागे ‘हे’ मोठे कारण Japanese Prime Minister Resignation ।
फुमियो किशिदा यांनी निवडणुकीपूर्वी ही घोषणा करणे अत्यंत धक्कादायक आहे. किशिदा यांनी पंतप्रधानपद सोडण्याचे कारण म्हणजे पक्षातील काही नेते किशिदा सरकारच्या विरोधात आंदोलन करत होते, असे सांगितले जात आहे. किशिदा सरकारच्या नेतृत्वाखाली पुढची निवडणूक जिंकणे कठीण आहे, असे पक्षाच्या काही नेत्यांचे मत आहे, कारण सध्या जपान पक्ष वादात सापडला आहे.
डिसेंबरमध्ये युनिफिकेशन चर्चशी असलेले संबंध आणि राजकीय निधीवरून झालेल्या वादामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. किशिदा यांच्या मंत्रिमंडळाच्या मंजुरीचे रेटिंगही सातत्याने घसरत आहे, हेही एक प्रमुख कारण मानले जात आहे. किशिदा यांच्या कार्यकाळात त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांचा भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांमध्ये सहभागही समोर आला आहे, त्यामुळे त्यांची लोकप्रियता 20 टक्क्यांच्या खाली गेली आहे.
हेही वाचा
मालदीव बनला गरीब! मुइज्जू सरकारडे खर्च भागवण्यासाठी पैसे शिल्लक नाहीत?