बाहुबली आणि बाहुबली 2च्या तगड्या यशानंतर दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या चाहत्यांमध्ये मोठ्या संख्येनं वाढ झाली. त्याचे चाहते फक्त भारतातच नाहीत तर परदेशातही त्याच्या चाहत्यांची वाढत चालली आहे. पण परदेशातील चाहत्यांमध्ये जपानमधील चाहत्यांची संख्या सर्वाधिक आहे. भारतातील चाहत्यांचं प्रभासवरील प्रेम आपण नेहमीच पाहतो पण जेव्हा प्रभासच्या जपानी चाहत्यांनी चक्क प्रभासला भेटण्यासाठी जपान ते भारत असा प्रवास केला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि विशेष म्हणजे या चाहत्यांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे.
Japanese fans infront of Young Rebel Star #Prabhas home, Next Level craze of #Prabhas in other countries pic.twitter.com/miVANjdIV2
— SKN (ఎస్ కె ఎన్) (@SKNonline) June 8, 2019
नुकतीच प्रभासच्या काही जपानी चाहत्यांनी भारताला भेट दिली. त्यांनी यावेळी प्रभासला भेटायचं ठरवलं आणि ते थेट हैदराबादला त्याच्या घरी पोहोचले. यातील काही मुलींनी त्याच्या घरासमोर पोज देत फोटो काढले. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. याआधी प्रभासनं त्याच्या जपानी चाहत्यांसाठी एक पत्र लिहून त्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.